रत्नागिरीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलाय. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे.