अंगारकी चतुर्थीनिमित्त रत्नागिरीच्या गणपतीपुळे इथे भाविकांनी मोठी गर्दी केली.पहाटे साडेतीन वाजल्यापासून गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी खुले आहे.दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली. नारळबागेत 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर व रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था आहे. आज रात्री साडेदहापर्यंत गणपतीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...