शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप नोंदवत संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्यानंतर संपूर्ण राज्यभर पडसाद उमटलेत.. त्यानंतर कम्युनिस्ट पक्षासह प्रशांत आंबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केली.. आज बुलढाणामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढून शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा इशारा देण्यात आला होता.. या आंदोलनासाठी प्रशांत आंबी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी हे बुलढाण्यात येत असतानाच चिखली पोलिसांनी त्यांना एका हॉटेलमध्ये स्थानबद्ध केलं.. मात्र आपण बुलढाण्यात आंदोलनासाठी जाणार अशी आक्रमक भूमिका प्रशांत आंबी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली.. आणि थेट हॉटेलमधून बाहेर पडत चिखली शहरांमध्ये रखरखत्या उन्हात, भर रस्त्यात पुस्तकाचे वाचन आणि घोषणाबाजी सुरू केली.. याच दरम्यान पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि आता त्यांना कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले आहे..