सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने परीक्षा वेळेत गाठण्यासाठी चक्क पॅराग्लायडिंगचा वापर केला! पासरानी गावातील समर्थ महांगडे या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर होत होता. नेहमीच्या रस्त्याने गेल्यास वाहतूक कोंडीमुळे त्याला वेळ लागणार होता. म्हणून त्याने साहसी खेळप्रेमी गोविंद येवले यांची मदत घेतली. येवले यांनी समर्थसाठी पॅराग्लायडिंगची व्यवस्था केली. समर्थ आकाशातून उडत परीक्षा केंद्रावर उतरला आणि त्याने वेळेत परीक्षा दिली! या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समर्थच्या कल्पकतेचे आणि साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान GPॲडव्हेंचर ॲण्ड स्पोर्टचे सदस्य किरण हेरकळ यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी