अंगारकी चतुर्थी हा योग वर्षातून दोनदा येतो, पण यंदा श्रावण महिन्यात मंगळवारी ही चतुर्थी येत असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. तब्बल २१ वर्षांनंतर असा दुर्मिळ योग जुळून आल्याने गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह आहे.