चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही 7 हजार रुपयांची वाढ झालीय.दोन दिवसात चांदीच्या दरात तब्बल 14 हजार रुपयांची वाढ झाली.चांदीच्या दरात वाढ होत असताना सोन्याच्या दरात मात्र 2 हजार रुपयांची घसरण झालीय. जळगावमध्ये जीएसटीविना सोन्याचे दर 1 लाख 21 हजार रुपये तर जीएसटीसह सोन्याचे दर 1 लाख 24 हजार 630 रुपये इतके आहेत.जीएसटीविना चांदीचे दर 1 लाख 67 हजार रुपयांवर पोहोचले असून जीएसटीसह चांदीचे दर तब्बल 1 लाख 72 हजार रुपयांवर गेलेत.