दक्षिण सोलापूर तालुक्यात रात्री पावसाचा जोर, ओढे, नाले, नदी यांची पाणी पातळी वाढली.सोलापूर जवळील कासेगाव उळे गावाला जोडणारा ओढा ओव्हर फ्लो झाला आहे. कासेगाव उळेगावाला जोडणारा ओढा पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामस्थांची अडचणीत वाढ झाली आहे. उळे कासेगाव ग्रामस्थांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. कासेगाव येथील ओढयाचा पूल मंजूर असूनही ग्रामस्थांना कामाची प्रतीक्षा करावी लागते.