विधानसभा जिंकण्यासाठी आमदारांना भरीव निधी दिला जाणार आहे. मतदार संघात कामांसाठी दोन ते पाच कोटींची मागणी करण्यात आलेली आहे तर सत्ताधाऱ्यांच्या झोळीत निधीचं वाण लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत चित्र बदलण्याच्या उद्देशाने, महायुतीच्या आमदारांसाठी अर्थसंकल्प वा पुरवणी मागण्यांमधून विशेष निधीची तरतूद केली जाणार आहे. मतदार संघात काम दाखवण्यासाठी दोन ते पाच कोटींची तरतूद करण्याची मागणी आमदारांकडून करण्यात आलेली आहे. त्यातून आमदारांना मतदार संघात काम सुरू झाल्याचं चित्र निर्माण करता येईल. त्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकेल.