भाजपचे नेते आणि गुहागरचे माजी आमदार डॉक्टर विनय नातूंनी भास्कर जाधवांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. भास्कर जाधव जातीत तेढ निर्माण करत असल्याचं विनय नातू म्हणाले. मुंबईतील एका मेळाव्यात भास्कर जाधवांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर आणि त्यांच्या गुहागर तालुका अध्यक्षांवर जळजळीत टीका केली. भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांना बेडकाची उपमा दिली. 'ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. मला परिणामांची चिंता नाही', असं आक्रमक वक्तव्य त्यांनी केलं होतं.