शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा सरकारची प्रचंड मोठी डोकेदुखी बनलाय. रोज उठून सगळेजण सरकारला कर्जमाफी कधी देणार असा प्रश्न विचारतायत आणि रोज नवं उत्तर शोधताना मंत्र्यांच्या नाकी नऊ येतायत.३१ मार्चपूर्वी कर्जाचे हप्ते भरा असं म्हणून अजित पवारांनी या मुद्द्याची सुरूवात केली.. मग त्यांच्याच पक्षाच्या कृषीमंत्र्यांनी कर्जमाफीचे पैसे शेतकरी खासगी कार्यक्रमांना वापरतात असं म्हणत वाद ओढवून घेतला.. आता अजितदादांनी कर्जमाफी कधी विचारणाऱ्या पत्रकारांनाच दमात घेतलं.. दादांनी हे असं दमात घेणं काही राज्याला नवं नाहीय... पण ते करताना दादांनी आपल्याच सरकारच्या आश्वासनावरून घूमजाव केलंय.. त्यामुळे कर्जमाफी हे आता असं दुखणं बनलंय, जे सांगताही येत नाहीय, आणि सहनही करता येत नाहीय.