कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्य दिनानिमित्त (१५ ऑगस्ट) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, १५ ऑगस्ट रोजी शहराच्या हद्दीतील सर्व मांसाहारी दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "कोण कधी काय खाईल, हे ठरवणारे तुम्ही कोण?" आव्हाड यांनी हा निर्णय नागरिकांच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.