युद्ध खरंच होईल काय? असा सवाल करत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून युद्धावर भाष्य करण्यात आलंय.आता जातनिहाय जनगणनेचा विषय आणून युद्धाची हवा थंड करणारेही आपले पंतप्रधान मोदीच आहेत असं सामनातून म्हटलंय.तर दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्यानंतर युद्ध. ते खरंच होईल काय? 56 इंच छातीवालेही छातीठोकपणे सांगू शकत नाहीत अशी टीकाही सामनातून करण्यात आली.