काल वादग्रस्त वक्तव्य,आज माध्यमांसमोर येत Bhaskar Jadhav यांनी काय दिलं स्पष्टीकरण | NDTV मराठी

मुंबईतील एका मेळाव्यात भास्कर जाधवांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर आणि त्यांच्या गुहागर तालुका अध्यक्षांवर जळजळीत टीका केली. भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांना बेडकाची उपमा दिली. 'ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. मला परिणामांची चिंता नाही', असं आक्रमक वक्तव्य त्यांनी केलं होतं. भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर ब्राह्मण सघटनेकडून जोरदार टीका होतेय...ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशींनी समाजाच्या नावानं पत्र लिहिलं. माझ्याविरोधात जिल्ह्यात किंवा राज्यात पत्र द्या. मी गटारात फेकून देईन', अशा शब्दांत ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत भास्कर जाधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान जाधवांच्या वक्तव्यावरुन टीका होत असताना आज भास्कर जाधव विधानावर ठाम राहिले... मी का माफी मागावी? मी कुठेही समाजाचा उल्लेख केला नाही, मी त्यांचा अपमान केला नाही असं जाधव म्हणाले.

संबंधित व्हिडीओ