भंडाऱ्यात प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याने 14 लोक जखमी झालेत. भंडारा शहरातील बाबा मस्तान शहा वार्ड इथं ही घटना घडली.बाल उत्सव शारदा मंडळाच्या वतीने महाप्रसाद बनवला जात होता.. त्यावेळी 40 लिटरच्या प्रेशर कुकरचा अचानक स्फोट झाला.यावेळी 14 जण जखमी झाले आहेत तर 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..