अहिल्यानगरच्या सभेतून गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी एमआयएमसह ओवैसींवर जोरदार हल्लाबोल केलाय.. अहिल्यानगर येथे शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. पाकिस्तानचे हिंदू भारतात आणा, इकडचे मुस्लिम तिकडे पाठवा, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, असं वक्तव्य पडळकरांनी केलंय.. त्याचबरोबर औरंगजेब तुमचा आजोबा आहे का असा सवाल करत पडळकरांनी ओवैसींवर निशाणा साधलाय.