बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक धक्कादायक अपघात घडला आहे. ड्रेनेजसाठी खोदलेल्या नाल्यात एक कार पलटली. संबंधित कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा नियम पाळले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.