माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'आमदार असल्यास २ कोटी मिळतात, पण मी नसतानाही २० कोटी मिळत आहेत,' असे विधान त्यांनी केले. दादरमधील कामांविषयी बोलताना त्यांनी आपला पराभव जाती-पातीच्या राजकारणामुळे झाल्याचेही सांगितले. मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असल्यामुळे कामं सुरू आहेत, असेही ते म्हणाले.