विठ्ठल भक्तीला डोळ्यांची नव्हे तर श्रद्धेची दृष्टी लागते, याचा प्रत्यय देणारी वारी धाराशिवच्या कळंब शहरात दाखल झाली... वाशिम येथील संत सूरदास महाराज दिव्यांग पायी वारीत अनेक वारकरी पाहयाला मिळताय.. या दिंडीत 15 दृष्टिहीन वारकरी आणि त्यांच्या सेवेसाठी 5 स्वयंसेवक सहभागी आहेत.. तब्बल 450 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत.डोळ्यांनी विठ्ठल पाहता येत नसला तरी अंतःकरणातील श्रद्धा, नामस्मरण आणि भक्तीच्या बळावर हे वारकरी पंढरीची वाट चालत आहेत. त्यांच्या जिद्दीचा आणि भक्तीभावाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय