बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपी जयराम चाटेने जामिन अर्ज दाखल केला.. मात्र त्याने जामीन अर्जात जामिनाचं एक वेगळंच कारण दिलंय... ते कारण आता समोर आलंय.. त्याने 10 वी आणि 12 वीत चांगले मार्क असल्याने जामीन मागितल्याचं समोर आलंय.. त्याचबरोबर त्याने बी.एस्सी.पदवीधर असल्याचंही सांगितलं.दरम्या, त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावाही त्याने केला.. त्यानंतर कोर्टाने त्याचा दावा फेटाळून लावला.. शिक्षण आणि चांगले मार्क जामिनासाठीचे कारण असू शकत नाही, असं कोर्टाने म्हटलंय.