यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या खंडाळा घाटात एसटीला भीषण आग.पुसद-अकोला बस मधील 43 प्रवासी थोडक्यात बचावले.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकातून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला खंडाळा घाटात अचानक भीषण आग लागल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी सुमारे 7.15 वाजण्याच्या सुमारास घडली.बसमध्ये 43 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.