US-Iran संघर्ष चिघळला,तेलाचे दर वाढले; शेअर बाजारांवरही परिणाम, अमेरिकेचा टोल, भारताला घोर?

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर स्पष्ट दिसू लागला आहे. तर जागतिक शेअर बाजारात घसरगुंडी पाहायला मिळाली. मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास दोन टक्क्यांनी वाढ झाली आणि क्रूडचे दर चार आठवड्याच्या उच्चांकावर उसळले. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 1.68 डॉलरनं म्हणजेच जवळपास 2% वाढून प्रति बॅरल 84.98 डॉलरवर पोहोचल्या तर, अमेरिकी WTI क्रूडच्या किमती $1.65 किंवा 2.1% वाढीसह प्रति बॅरल $79.79 वर पोहोचल्या आहेत. दरम्यान भारत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपल्या गरजेच्या जवळपास ४० टक्के कच्चे तेल, ६० टक्के नैसर्गिक वायू (LNG) आणि ९० टक्के एलपीजी याच मार्गाने आखाती देशांकडून आयात करतो. त्यामुळे नव्या टोल पद्धतीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, पाहूया नेमका कसा परिणाम होऊ शकतो

संबंधित व्हिडीओ