जालन्यात आंदोलकाला लाथ मारल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावण्यात आलीय... राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पोलिस अधीक्षकांना गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याची नोटीस दिलीय... उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी पालकमंत्री पंकजा मुंडेंना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं... त्यावेळी आंदोलकाला लाथ मारल्याचा प्रकार घडला होता.. त्यानंतर पोलिसाच्या मुजोरीवरून मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.. त्यानंतर आता मानवाधिकार आयोगाकडून अधीक्षकांना गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावण्यात आलीय..