ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं विधेयक केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलंय. या निर्णयामुळे ऑनलाईन जुगाराशी संबंधित सर्व ऑनलाईन गेम बंद होणार आहेत.. सरकारने उचललेलं पाऊल खरंच स्तुत्य आहे. मात्र ऑनलाईन गेमिंगमुळे लहान मुलांना होणाऱ्या मानसिक आजारांचा गंभीरतेने विचार होणं आणि त्यासंबंधीत कायदा अंमलात आणणं गरजेचं आहे का? केंद्र सरकार एक पाऊल पुढे जाऊन लहान मुलांच्या हितासाठी काही निर्णय घेणार का ? पाहुयात