आज सकाळी सकाळी सगळ्यांच्या नजरेत आलेली बातमी होती अवधूत साठेंची..सोशल मीडियावरुन शेअर बाजारात ट्रेडिंग कसं करायचं याचे धडे देणारे अवधूत साठे यांच्यावर सेबीची कारवाई सुरु झालीय. विना नोंदणी गुंतवणूक सल्ले देऊन मोठी कमाई केल्याचा संशय साठेंवर असल्यानं सेबीनं त्यांच्या ट्रेनिंग इन्स्टिट्युची झड़ती घेतलीय. आणि काही वस्तू आणि कागदपत्र जप्त केलीय. अवधूत साठेंनी सगळे आरोप फेटाळले असून सेबीच्या चौकशीत सहकार्य करत असल्याचं म्हटलं. पाहुयात नेमकं काय घडलयं.