आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. भुजबळ जरांगेंना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर जरांगेही भुजबळांवर पलटवार करायला तयार असतात. भुजबळांनी मराठा समाजाला चार प्रश्न विचारले आहेत आणि ‘जे शिकले आहेत, त्यांनाच आरक्षणाबद्दल समजेल,’ असे सांगत जरांगेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेला शाब्दिक संघर्ष आणि त्यांच्यातील सवाल-जवाब.