गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर का आहेत? उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण असूनही ते दिल्लीला का गेले नाहीत? आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी केवळ ट्विटरवरच प्रतिक्रिया दिली. निर्भीड आणि तडफदार नेत्याचा असा वारंवार 'मिस्टर इंडिया' का होतोय, यामागील कारणे आणि राजकारणावर होणाऱ्या परिणामांवर सखोल विश्लेषण.