एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहा खासदारांनीही अमित शाह यांची भेट घेतलीय. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघातील विकासकामांबाबत शाहांसोबत चर्चा केलीय. त्यात प्रामुख्याने धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाची निर्मिती, धाराशिव-सोलापूर रेल्वे मार्ग, मिलिट्री कॅन्टीन आणि MIDC मध्ये उद्योग आणण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.