बार्शी तालुक्यातील सासुरे येथे एका युवकाने नर्तिकीच्या प्रेमात गोळीबार मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षापासून प्रेम करणाऱ्या प्रेयसीच्या घरासमोरच गाडीत बसून मध्यरात्रीच्या सुमारास गोळी मारून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे असे गोळी मारून घेतलेल्या युवकाचे नाव आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पदाधिकारी आणि लुखामसला गावचे माजी उपसरपंच असल्याचं समोर आला आहे. सदर गोविंद बर्गे याचं वैराग जवळील सासुरे येथील एका नर्तिकेसोबत प्रेम प्रकरण होते. गोळीबार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.. दरम्यान ज्या नर्तिकीमुळे गोविंद यांनी आत्महत्या केली तिला पोलिसांनी अटक केलीए...